`कार्टून` रणवीरचा आणखी एक कारनामा
रणवीरने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क कार्टूनचे कपडे घातले आहेत.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग अतरंगी कपडे घालण्याच्या अव्वल स्थानी नेहमीच असतो. त्याच्या कपड्यांमुळे तो नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाच्या वेळेस सोशल मीडियावर अनेक विनोद मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यातील एक विनोद भलताच व्हायरल झाला. तो म्हणजे रणवीर पत्नी दीपिकाचे लग्नाचे कपडे घालण्याचा. या विनोदाला नेटकऱ्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले.
आता परत रणवीरने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क कार्टूनचे कपडे घातले आहेत. एका पांढऱ्या रंगाच्या जॅकेट मध्ये रणवीर दिसत आहे. जॅकेटवर विविध रंगाचे स्टिकर्स आहेत.त्याच्या या फोटोला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले. पण कार्टूनचे कपडे घातलेला रणवीर चाहत्यांना काही आवडलेला नाही.
नेटकऱ्यांनी रणवीरची तुलना सुविलियन कार्टूनसोबत केली. रणवीरच्या या लुकची चाहते खिल्ली उडवत आहेत तर रणवीरचा हा लुक माझ्या आवडतीचा असल्याचे दीपिकाने सांगितले.
दीपिकाने रणवीरचा फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये 'माझ्या आवडतीच्या लुक्स पैकी एक फोटो' असे लिहीले आहे.
दीपिका लवकरच 'छपाक' सिनेमात अॅसिड ह्ल्ला पिडीत मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिनेमा '83' मध्ये क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे 14 फेब्रुवारी रोजी रणवीरचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'गली बॉय' सिनेमागृहात दाखल होणार आहे.