ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर रुग्णालयात दाखल
मुंबईतील एन.एच रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात भरती करण्यात आलं.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत बिघडल्याने, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऋषि कपूर यांचे मोठे भाऊ आणि अभिनेते रणधीर कपूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेमध्ये कॅन्सरवर उपचार केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतले होते.
67 वर्षीय ऋषि कपूर यांना बुधवारी मुंबईतील एन.एच रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात भरती करण्यात आलं. ते कर्करोगानेग्रस्त असून त्यांना श्वास घेण्यास समस्या होत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं.