मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या  हटके स्टाईलमुळे विशेष चर्चेत असते. सलमान खानचं मोठं फॅन फॉलोविंग नेहमीच त्याच्या नवीन चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. यासोबतच सलमान वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चाहते जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मागील महिन्यात एक धक्कादायक बातमी समोर आली होती, की सलमान खानला सर्पदंश झाला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावेळी सलमान खास वाढदिवसाआधीच आपल्या पनवेल फार्महाऊसवर गेला होता. कामातून ब्रेक घेत लहान येथे नेहमीच जाताना दिसतो. 


सलमान खान आणि या फार्महाऊसच विशेष नातं आहे. कित्येक वर्षांपर्वी घेतलेल्या या फार्महाऊसवर त्याने कोरोना काळात स्वत:ला क्वॉरंटाईन केलं होतं. त्याच्यासोबत त्याचे सेलिब्रिटी फ्रेण्ड देखील या ठिकाणी येताना दिसतात. 


तेथील फोटो सोशल मीडियावर देखील सोशल मीडियावर भाईजान शेअर करताना दिसतो. पण सलमानने कित्येक वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या या फार्महाऊसची किंमत आज किती याबाबत सतत चर्चा होत असते. तसेच या हा फार्महाऊसमधील फोटो पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.



सलमानचा हा फार्महाऊस 150 एकरमध्ये आहे. या फार्महाऊसवर घोडे आहेत. हॉर्स रायडिंगसाठी खास असे मैदान तयार करण्यात आले आहे.



अनेकदा सलमान येथे घोड्यांसोबत वेळ घालवाताना दिसतो, हॉर्स रायडिंग करताना दिसतो. सलमानने फार्महाऊसवर सायकल देखील ठेवली आहे. अनेक झाडे लावली आहेत.



येथे तो बऱ्याचदा शेती देखील करताना दिसतो, त्यामुळे येथे ट्रॅक्टर देखील आहे. सलमान दरवर्षी वाढदिवस याच फार्महाऊसवर साजरा करताना दिसतो.


सलमानच्या या फार्महाऊसची किंमत जवळपास 80 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.