मुंबई : महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे. लेखक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक या भूमिका पू.ल.देशपांडेंनी साकारल्या. आता याचं पु.ल.ची जीवनगाथो मोठ्या प़़डद्यावर निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर घेऊन येत आहेत. 2019 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होत असून 'फाळकेज फॅक्टरी' या नावाने चित्रपट निर्मितीची नवी कंपनी सुरू केली आहे. भाई : व्यक्ती की वल्ली सिनेमांतून पु.ल.देशपांडे यांच्यावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुख्य भूमिकेत कोण?


10 जून रोजी या सिनेमाचं पोस्टर लाँच झालं. यानंतर पु.ल.देशपांडेंची भूमिका कोण साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर हे नाव समोर आलं आहे. अभिनेता समीर देशमुख पु.ल.देशपांडे यांची भूमिका तर अभिनेत्री इरावती हर्षे या सुनीताबाई म्हणजे पु.ल.च्या पत्नी यांची भूमिका साकारणार आहे. या दोन्ही नावाने प्रेक्षक अतिशय खुश झाले आहेत. 


या सिनेमांत कोण कोण? 


"ओ काका.... " या गाण्यातून सागर अगदी प्रत्येकाच्या लक्षात राहीला. सागरला प्रेक्षकांनी यापूर्वी हंटर आणि वायझेड या चित्रपटांमध्ये पाहिले आहे.  या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांची असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रंगभूषेतील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले विक्रम गायकवाड रंगभूषेतून अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना चेहरा देणार आहेत. यामध्ये पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. या भूमिका साकारण्यासाठी प्रथितयश आणि अभ्यासू कलाकारांची निवड झालेली आहे.