मीरा राजपूतला जेव्हा नशेखोर शाहीद कपूर नको होता....
अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत.
मुंबई : अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी देखील समोर येत असतात. पण आता एक असा किस्सा समोर आला आहे, ज्यामुळे मीरा आणि शाहीद कधीचं एकत्र आले नसते. एवढंच नाही तर, मीराने शाहीदला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता...
एका मुलाखतीत शाहीदने सांगितलं, एक वेळ अशी आली, जेव्हा मीराला असं वाटलं की, तिने चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे.... शाहीद म्हणाला, 'आमचं नवीन लग्न झालं होतं. तर मी मीरा विचारलं 'उडता पंजाब' सिनेमा पाहाण्यासाठी येते का?'
'तेव्हा ती म्हणाली हो... एडिटींग सुरू होती तेव्हा सिनेमाची... मीरा माझ्या बाजूला बसली होती... इंटरवल आल्यानंतर मीरा माझ्यापासून दूर झाली... मी तिला विचारलं काय झालं?'
पुढे शाहीद म्हणाला, 'तेव्हा मी तिला एवढं ओळखत नव्हतो... कारण अरेंज मॅरेज होतं... सिनेमा पाहिल्यानंतर ती म्हणाली, तू असा मुलगा आहेस का? तु असाचं मुलगा आहे का? मला तुझ्यासोबत नाही राहायचं...'
'तिला असं पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला... मी मीराला सांगितलं, मी टॉमी सिंग नाही. त्याचा आणि माझा काही संबंध नाही...', मीरा आणि शाहीदच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर दोघांचं लग्न 2015 साली झालं. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे...