मुंबई : बॉलिवूड अभिनेता शरमन जोशीच्या वडिलांचं निधन झालं आहे. गुजराती रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे गुजराती रंगमंचाचं मोठं नुकसान झालं आहे. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ट्रेड अॅनलिस्ट कोमल नहटा यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक अरविंद जोशी यांच्या निधनाची माहिती दिली. अरविंद यांचं निधन नानावटी रुग्णालयात झालं. मात्र त्यांच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरविंद जोशी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. अरविंद यांच्या निधनाने अभिनेते परेश रावल यांना देखील मोठा धक्का बसला आहे. परेश रावल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले, 'भारतीय रंगभूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जोशी कुटुंबाला या मोठ्या दु;खातून बाहेर येण्यासाठी देव शक्ती देओ..' 



अरविंद जोशी यांनी गुजरातीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्यांनी काम केलं. ‘इत्तेफाक’, ‘शोले’, ‘अपमान की आग’, ‘खरीदार’, ‘ठिकाना’, ‘नाम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.