मुंबई : ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकरने मुहूर्तावर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. शशांक केतकर लवकरच बाबा बोणार आहे. ही गोड बातमी खुद्द शशांकने सोसल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितली आहे. पत्नी प्रियांका ढवळेसोबत त्याने एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये दोघे देखील प्रचंड आनंदी दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशांकने फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिलं आहे. 'आम्हाला माहित होतं सॅन्टा जीवनात प्रचंड आनंद घेवून येतो. त्याचप्रमाणे गिफ्ट देखील घेवून येतो. आम्हाला देखील लवकरच गोड गिफ्ट मिळणार आहे.' या गिफ्टसाठी आम्ही आभारी आहोत असं देखील शशांक म्हणाला आहे. 


त्याचप्रमाणे त्याने चाहत्यांना हॉलिडे सिझनच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शशांकनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांसोबतच इतर सेलिब्रिटींनी देखील त्याच्यावर अभिनंदानाचा वर्षाव केला आहे.