मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला 2 सप्टेंबर रोजी चाहते, कुटुंब, मित्र आणि गर्लफ्रेन्ड शेहनाज गिलला सोडून गेला. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचं ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. सिद्धार्थला ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रूग्णालयात दाखल करताचं डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केलं. सिद्धार्थ आज नसला तरी चाहत्यांच्या मनात तो कायम जिवंत राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थबद्दल एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे, तो अत्यंत फिटनेस फ्रिक होता. याचं कारणामुळे त्याचं निधन झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. आता सिद्धार्थ तर कधी परत येवू शकत नाही. पण सिद्धार्थ जाता-जाता महत्त्वाच्या गोष्टी शिकवून गेला आहे. 


धूम्रपान सोडा
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर आपण सर्वांनी जाणून घ्यायला हवं की धूम्रपान करू नये. अद्याप आपल्याला काही झालं नाही असं वाटतं असेल तर; हे चूक आहे. त्यामुळे धूम्रपान करून शरीरावा इजा पोहोचवू नका.


आराम तितकाचं गरजेचा
आताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे. त्यामुळे काम आणि महत्वाकांक्षावर जोर देण्याबरेबरचं शरीराला आराम देणं देखील तितकचं महत्त्वाचं आहे. 


नियमित आरोग्य तपासणी
शरीरात लहान समस्या असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. या समस्या अशा आहेत की आपल्या लक्षातही येत नाहीत.  त्यामुळे तुमची नियमित आरोग्य तपासणी करा आणि जर काही समस्या दिसली तर त्यावर उपचार करा.