``डास अन् प्रचंड उकाडा; AC नाही त्यात प्रेक्षकांचा गोंधळ...`` वैभव मांगलेंच्या पोस्टमुळे नाट्यगृहातील गैरसोय पुन्हा चर्चेत!
Vaibhav Mangle Post on Ac Issue in Natyagruha: सध्या उकाड्याचे दिवस आहेत त्यातून नाट्यगृहात एसी नसल्यानं प्रेक्षकांना मात्र फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रेक्षक हैराण झाले असून याबाबत अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle News) यांनी एक संप्तत पोस्ट शेअर केली आहे.
Vaibhav Mangle Post: आज मराठी नाटक पाहायला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत परंतु त्याचबरोबर (Vaibhav Mangle Angry) प्रेक्षकांना मात्र उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर भर नाटक सुरू असताना एसी अभावी घामाच्या धारा अन् उकाड्याचा सामना करावा लागतो आहे. अभिनेते वैभव मांगले यांनी याबद्दलची एक संतप्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या आणि नाटकांना मिळणारा प्रतिसाद पाहता नाटकांचे प्रयोगही वाढू लागले आहेत परंतु भर उकाड्यात रसिक (Vaibhav Mangle Non AC) एसीच्या थंड हवेशिवाय असमाधानानं नाटक पाहतायेत हे पाहून वैभव मांगले यांनी आपले मुद्दे स्पष्ट केले आहेत. (actor vaibhav mange raises non ac issue in natyagruha as audience faces trouble of extensive heat while watching show of sanjya chaya)
मे महिन्यात सध्या उकाडा वाढला आहे त्यातून यावेळी नाटकाचे प्रयोग लावणंही डोकेदुखी होणार की काय अशी परिस्थिती दिसते आहे. कारण एसी नसलेल्या नाट्यगृहामध्ये 'संज्या-छाया' या लोकप्रिय नाटकाचा प्रयोग झाला आणि प्रेक्षकांसह कलाकारांना एसीशिवायच नाट्यगृहात उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. याबाबत वैभव मांगले यांनी रविवारी आपल्या फेसबुक (Vaibhav Mangale Post Facebook) अकांऊटवरून एक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये ते म्हणाले, ''पुणे, छ.संभाजीनगर, नाशिक येथे 'संज्या छाया' नाटकाचे प्रयोग झाले. एका ही ठिकाणी वातानूकुलित यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व, पुणे येथे खूप डास आणि उकाडा होता व यशवंतराव, कोथरूड येथे प्रचंड उकाडा होता) प्रयोग पाहात होते. एक मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग आणि हतबलता अनावर झाल, त्यांनी गोंधळ सुरू केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का?, याचा विचार करू लागले. पण आपण show must go on वाले लोक. आम्ही विनंती केली की आम्हालाही त्रास होतोच आहे. इथे येईपर्यंत माहित नव्हतं की ac नाही आहे.'' ते पुढे म्हणाले की,
हेही वाचा - K Pop प्रसिद्ध गायिका हेसूचा हॉटेलमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह, चाहत्यांना धक्का
''आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27 चे शो रद्द केले. त्यात हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदास नाट्यगृहात तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होते आहे. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी??? विचारलं तर सांगतात ac चालू आहे पण खूप गर्मी असल्याने ac यंत्रणा नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. काय बोलावं या सगळ्यावर वर????????'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सध्या त्यांच्या या पोस्टवर प्रेक्षकांच्या नानातऱ्हेच्या प्रतिक्रिया (Audience Reactions to Vaibhav Mangle Post) येताना दिसत आहेत.