मुंबईः गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये, अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, दोघांनीही आपलं नातं गुपित कसं ठेवलं याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह हा गेल्या वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम होता. त्यांच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. एकीकडे चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता होती तर दुसरीकडे दोघांनी लग्नाच्या दिवसापर्यंत आपलं नातं गुपित कसं ठेवलं हे जाणून घ्यायचं होतं.


विकी आणि कतरिना दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अनेक वेळा हिंट दिल्या होत्या पण त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. खरं तर, हे सर्व 2018 मध्ये सुरू झालं, जेव्हा कतरिना कैफने विकी कौशलसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.



2018 साली जेव्हा कतरिना कैफला करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये कोणासोबत काम करायला आवडेल असे विचारण्यात आले तेव्हा तिने विकी कौशलचे नाव दिले आणि म्हणाली, 'आम्ही एकत्र छान दिसतो. त्याचवेळी जेव्हा विकी कौशल शोमध्ये पोहोचला तेव्हा करणला कतरिनाच्या वक्तव्यावर विकीची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती, तेव्हा अभिनेत्याने विचारले, 'खरंच?' असे म्हणत तो सोफ्यावर पडला.



विकी कौशल आणि कतरिना कैफने 2020 मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या होळी पार्टीलाही हजेरी लावली होती. दोघेही प्रियांका चोप्रा आणि निक जोनाससोबत होळी खेळताना दिसले होते.


निक जोनासने त्याच्या इंस्टाग्रामवर होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. प्रियांका आणि कतरिनासोबत निकचे होळीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विकीही थोडक्यात दिसला.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफने गेल्या वर्षी अलिबागमध्ये एकत्र नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं होतं. चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दोघांनीही आपल्या भावंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.


 त्याच वेळी, कतरिनाने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये चाहत्यांना असे वाटले की अभिनेत्रीच्या मागे आरशात दिसणारा तो दुसरा कोणी नसून विकी कौशल आहे. मात्र, कतरिनाने लगेच हा फोटो डिलीट केला.