दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याचं पहिल्या पत्नीसोबत अफेअर; रात्री बेडरूममधून जायचा पळून
दुसऱ्या पत्नीच्या नकळत रात्री पहिल्या पत्नीला भेटायला जायचा हा अभिनेता
मुंबई : अन्नू कपूर या व्यक्तिमत्वाचं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभी राहते ती संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी. आपल्या अभिनयाने आणि सूत्रसंचलनाने प्रेक्षकांना अन्नू कपूर यांनी कायमच खिळवून ठेवलं आहे.अन्नू कपूर या व्यक्तीकडे जेवढे किस्से असतील तेवढे किस्से फारच कमी लोकांकडे असतील. अन्नू कपूर यांनी नेहमीच त्यांच्या बोलण्यातून विविध कलाकारांचे किस्से प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. अन्नू कपूर त्यांच्या प्रोफेशनला आयुष्याप्रमाणे त्यांचं खासगी आयुष्यही कायम चर्चेत राहिलं.
अन्नू कपूर यांची लव्ह स्टोरी एका चित्रपटातील कथेपेक्षा कमी नाही. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक ट्विस्ट आले. अन्नू यांनी पहिली पत्नी अनुपमाला सोडचिठ्ठी दिली आणि दुसरं लग्न केलं. अनुपमा अमेरिकेच्या असून दोघांमध्ये 13 वर्षांचं अंतर होतं. सुमारे 17 वर्षे एकत्र राहिल्यानंतर अन्नू आणि अनुपमा यांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर एका म्यूझिकल शोदरम्यान त्यांची भेट अरूणिता यांच्यासोबत झाले. दोघांमधील मैत्री वाढली कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा देखील आहे. दरम्यान त्याचं अफेयर सुरु झालं आहे. अन्नू रात्री उठून बेडरूममधून निघून जायचे. या गोष्टीचा खुलासा अरुणिता यांनी एका मुलाखती दरम्यान केला.
अरूणिता यांना कालांतराने कळालं की ज्या महिलेसोबत त्यांचं अफेअर सुरू आहे, त्या अन्नू यांच्या पहिल्या पत्नी अनुपमा होत्या. अफेअरनंतर अन्नू यांनी घरी पैसे देणं देखील बंद केलं. अन्नू यांच्या अफेअरबद्दल कळाल्यानंतर अरूणिता आणि अन्नू कपूर विभक्त झाले. अखेर 2008 साली अन्नू यांनी पुन्हा पहिली पत्नी अनुपमासोबत लग्न केलं.