मुंबई : लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री आरती दास यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी निधन झालं आहे. आरती दास बंगाली अभिनेत्री असून त्या मिस शेफाली नावाने लोकप्रिय होत्या. गुरूवारी पश्चिम बंगालच्या नोर्थ 24 येथील घरात हार्ट अटॅक आल्याने निधन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूवारी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. यामुळे त्या बैचेन झाल्या. यानंतर तात्काळ त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांच निधन झालं, अशी माहिती त्यांची भाची एल्विन शेफाली यांनी दिली. काही दिवसांपासून आरती दास या किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. 



आरती दास 60-70 च्या दशकातील लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री होत्या. दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या प्रतिद्वंदी आणि सीमाबद्द सिनेमांत काम केलं आहे. त्या सिनेसृष्टीत 'क्वीन ऑफ कॅब्रे' नावाने ओळखल्या जात असतं. 1968 सालच्या 'चौरंगी' सिनेमातून आरती दास यांनी सिनेकरिअरला सुरूवात केली होती. या सिनेमातून आरती दास यांनी लाखो चाहत्यांची मन जिंकली होती. सिनेमासोबतच थिएटरमध्ये आरती दास हे मोठं नाव होतं. त्यांनी 'सम्राट ओ सुंदरी', 'साहिब बीबी और गुलाम' आणि 'अश्लील' सारख्या नाटकात काम केलं आहे.