Abhidya Bhave Trolled: सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या गणपती बाप्पांची. सध्या सेलिब्रेटींच्या घरी गणपती विराजमान झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. सर्वत्र सेलिब्रेटी आपल्या घरी आलेल्या गणपतींचे फोटो, डेकोरेशनचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी तिनं केलेलं डेकोरेशन हे चाहत्यांना फार आवडलं असलं तरी तिच्या एका कृतीमुळे मात्र नेटकरी फारच नाराज झाले आहेत. एकीकडे आपण इकोफ्रेंडली गणपतीला प्रमोट करतो किंवा अनेकदा सेलिब्रेटीही अशाप्रकारे प्रमोट करताना दिसतात. परंतु यावेळी या अभिनेत्रीनं आपल्या गणपती डेकोरेशनसाठी बॅकराऊंडला झाडाचे डेकोरेशन केले खरे परंतु त्यावेळी मात्र तिनं यासाठी चक्क झाडं तोडलं आहे म्हणून नेटकरी तिला ट्रोल करताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सोशल मीडियावर तिनं आपल्या बाप्पांचे फोटो हे शेअर केले आहेत. ज्यात तिनं आपल्या गणपतीच्या डेकोरेशनचे फोटो हे शेअर केले आहेत. परंतु त्याचसोबत तिनं या डेकोरेशनचा मेकिंग व्हिडीओही शेअर केला आहे. यंदा तिनं झाडापासून डेकोरेशन केले होते. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की चक्क ती या डेकोरेशनसाठी झाडं तोडताना दिसते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी नेटकऱ्यांनी मात्र तिला फारच झापलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ती अभिज्ञा भावे आहे. यावेळी तिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. 


हेही वाचा : मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीची दादागिरी; कॅमेऱ्यामध्ये आला म्हणून एकाला पाठीत धपाटा तर...


या व्हिडीओत तुम्ही स्पष्ट पाहू शकता की झाड हे तोडलं जात आहे आणि सोबतच ते कापलंही जात आहे. त्यातून यावेळी डेकोरेशनचाही मेकिंग व्हिडीओ यावेळी तयार केला जातो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिच्या या व्हिडीओ खाली नेटकरी नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एकानं कमेंट केली आहे की, 'खूपच छान... झाडाचे खोड खूप छान तयार केले आहे..अगदी खरे वाटते आहे... आणि फांद्या खऱ्या असल्यामुळे ते मस्त दिसते आहे...' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, 'सुंदर.. पण decoration साठी झाड का तोडलं??' तर तिसऱ्या एकानं लिहिलंय की, 'खुपच सुंदर पण झाड तोडले याचे वाईट वाटले. असो त्याबदल्यात ४ झाडे लावा'