मुंबई : २०१८ हे वर्ष अतिशय खास ठरलेल्या अभिनेत्री अमृता खानविलकरचा या वर्षातील प्रवास अमृताच्या उत्तम अभिनय, नटखट अदा आणि गोड हास्यामुळे अनेकांच्या स्मरणात एक ताजी आठवण म्हणून राहिला आहे आणि पुढेही राहिल. अमृता नेहमीच एकापेक्षा एक दमदार पात्र साकारुन प्रेक्षकांना सरप्राईज करत आहे. ज्याप्रमाणे कथेत नाविन्य असतं त्याचप्रमाणे अमृताने साकारलेल्या प्रत्येक पात्राची छटा ही जरा वेगळी असते आणि यानिमित्तानेच अमृताला विविध रुपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात अमृताने पाकिस्तानी आर्मीची पत्नी ‘मुनिरा’ आणि त्यानंतर ‘डॅमेज’  या वेब सिरीजमधील ‘लोव्हीना’ हे सिरीयल किलरचे पात्रं साकारले. या सर्व पात्रांच्या सादरीकरणानंतर अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृता अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची म्हणजेच सरिताची भूमिका साकारत आहे.



अमृतासाठी सरिताची भूमिका ही अगदी सोपी होती, यासाठी तिला विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाही. कारण ख-या आयुष्यात जसा अमृताचा स्वभाव आहे अगदी तसाच हुबेहूब सरिताचा आहे. जसे की आपली अमृता जशी खोडकर, मस्तीखोर, प्रेमळ तशीच सरिता देखील आहे. विशेष म्हणजे काय बरोबर, काय चूक याची योग्य जाणीव जशी अमृताला आहे तशीच सरिताला पण आहे. या चित्रपटाच्या आणि पात्राच्या निमित्ताने अमृताचा खरा स्वभाव आणि तिचे विचार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मनोज बाजपेयी आणि मनमिळावू अमृता यांची पती-पत्नीची ऑन-स्क्रिन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे