Marilyn Monroe : मादक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मर्लिन मुनरो, या अभिनेत्रीची एकतरी झलक तुम्ही आतापर्यंत पाहिली असेल. तिचा चित्रपट पाहिला नसेल तरीही एखादा फोटो मात्रस तुमच्या डोक्यात नक्कीच घुटमळत असेल. हे असं खात्रीनं म्हणण्याचं कारण म्हणजे या अभिनेत्रीचं आरस्पानी सौंदर्य आणि त्याला असणारी मादकतेची जोड. हॉलिवूडमध्ये (Hollywood) असणारा तिचा वावर, खुद्द जॉन एफ. केनेडी यांच्यासोबत असणारं तिचं नातं आणि तिचा एकाकीपणा.... मर्लिन चर्चेत असण्यासाठी अशी बरीच कारणं होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झगमगाटामध्ये असणाऱ्या या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य मात्र शापित होतं असं म्हणावं लागेल. प्रेमाच्या वाटेत मिळालेलं अपयश, मानसिक आरोग्यावर झालेले आघात, त्यातच कलाजगताच्या खऱ्या रुपानं काही वेळा दिलेली प्रचिती हे सर्वकाही मर्लिनचा एकटं पाडत होतं. 


अशा या अभिनेत्रीच्या आयुष्यावर भाष्य करणारा 'ब्लॉन्ड' (Blonde) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूड अभिनेत्री अॅना दे आर्मस (Ana De Armas) या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहे. 


काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या वेनिस चित्रपट महोत्सवात 'ब्लॉन्ड'चं स्क्रीनिंग करण्यात आलं. यावेळी तिनं एक अनपेक्षित अनुभव सांगितला. लेखकांशी संवाद साधताना अॅना दे आर्मसनं आपल्याला तिथं मर्लिनचं (Marilyn Monroe) भूत दिसल्याचं सांगितलं. 



'मला असं वाटत होतं, की सेटवर मर्लिनही होती... ती आनंदात होती. कारण, जर तिला काही आवडत नव्हतं, तर भींतीवर असणाऱ्या गोष्टी खाली पाडत होती. ऐकताना विश्वास बसणार नाही. पण, हेच खरंय. आम्ही हे अनुभवलंय...', असं ती म्हणाली. 


अॅनानं मर्लिन आपल्या मनाच्या अतिशय जवळ असल्याचं सांगत चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासात ती आपल्यासोबतच होती, असंही सांगितलं. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही (blonde trailer) प्रदर्शित करण्यात आला होता. हॉलिवूडच्या या सौंदर्यवतीला साकारण्यासाठी अॅनानं घेतलेली मेहनत तुम्ही पाहिली? 


(वरील प्रसंग वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. झी 24 तास तत्सम कोणत्याही समजुतीला खतपाणी घालत नाही.)