Anasuya Bharadwaj : मी कमजोर व्यक्ती, मी स्वत:ला..., `पुष्पा` फेम अभिनेत्री ढसाढसा रडली; पाहा Video
Anasuya Bharadwaj crying Video: आपण एकमेकांना आधार देऊ शकतो, आनंद आणि दु:ख शेअर करू शकतो, असं अनसूया भारद्वाज म्हणते. त्यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
Anasuya Bharadwaj Viral Video: पुष्पा 2: द रुल, भीष्म पर्व, F2: फन अँड फ्रस्ट्रेशन, यात्रा आणि रंगस्थलम सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अनसूया भारद्वाज. अनसूया भारद्वाजने टीव्ही अँकर म्हणून सुरूवात केली आणि आता ती तेलगू सिनेमामध्ये जम बसवताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील अनुसया अॅक्टिव असल्याचं दिसतंय. अशातच आता अनुसयाचा एक व्हिडीओ सध्या तुफान ट्रेंडमध्ये असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. अनुसयाला नेमकं काय झालंय? असा सवाल आता विचारला जात आहे.
काय म्हणते Anasuya Bharadwaj?
आशा आहे की तुम्ही सर्व बरे असाल. मला माहीत आहे की माझी ही पोस्ट पाहणारे तुम्ही सगळेच गोंधळलेले असाल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माझ्या माहितीत आला ज्यामुळे आपण लोकांशी कनेक्ट होऊ शकतो, ते एक चांगले ठिकाण बनवू शकतो, जेणेकरून आपण एकमेकांना आधार देऊ शकतो, आनंद आणि दु:ख शेअर करू शकतो, असं अनसूया भारद्वाज म्हणते. त्यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोस्ट शेअर करण्याचा उद्देश म्हणजे तुम्हाला सांगण्याचं आहे की सर्व पोझ, फोटोशूट, स्पष्टता, स्मित, नृत्य इत्यादी सर्व गोष्टी माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत. तुम्हीही भावनेने भरलेली लोक आहात, म्हणून मी ते सर्व तुमच्यासोबत शेअर करतो आणि हे माझ्या आयुष्याचे काही टप्पे आहेत. जिथं मी पुरेशी समर्थ नाही. मी कमजोर व्यक्ती आहे, असं अनसूया म्हणते.
मी माझ्या भावना तुमच्याशी थेट शेअर करू शकते. जेव्हा मला वाटतं की माझं धैर्य तुटतंय तेव्हा मी स्वत:ला वेळ देते आणि मी रडतो आणि एक-दोन दिवसांनी मी जुन्या जीवनात आनंदाने परतते. एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून मला भावनांबद्दल तटस्थ राहावे लागेल, असंही अनसूया भारद्वाज हिने म्हटलं आहे. मला सर्वांना सांगायचंय की, इतरांना समजून घ्या. जरी तुम्हाला कोणी काही सांगितलं तरी कदाचित त्याचा दिवस वाईट जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी सुद्धा तेच शिकत आहे.
पाहा Video
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनसूयाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची माहिती दिली आहे. आता मी पूर्णपणे बरी असल्याचं अनुसयाने सांगितलं आहे. मात्र, तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तर तिच्या फॅन्सने तिला काळजी घेण्याता आवाहन केलंय. तर काहींनी तिला ट्रोल करत मानसोपचार तज्ज्ञांना दाखव असा सल्ला देखील दिलाय.