सीझर झालं म्हणून ट्रोल करणाऱ्यांना उर्मिलाने केलं गप्प, म्हणाली...
बाळाच्या भोवती दोनदा नाळ गुंडाळली गेली जी emergency नव्हती पण
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सध्या आपल्या आयुष्यातील खास क्षण अनुभवत आहे. उर्मिलाने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. उर्मिलाने नवव्या महिन्यात राजेशाही अंदाजात केलेलं डोहाळे जेवण चांगलच चर्चेत होत. या डोहाळे जेवणाचा सुंदर असा व्हिडीओ देखील खूपच व्हायरल झाला.
पण बाळाच्या आगमनानंतर उर्मिलाला एक प्रश्न अनेकांनी विचारला , ज्यासाठी उर्मिलाने आता थेट पोस्ट शेअर केली आहे. उर्मिलाचं सीझर झालं. त्यामुळे तिला अनेकांनी इतकी काळजी घेतल्यानंतर ही सीझर का करावं लागलं असता प्रश्न करायला सुरुवात केली. याच उत्तर देत त्याची काही कारण उर्मिलाने सांगितली आहेत.
हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत उर्मिला म्हणते... "अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचे कारणही, मी यांचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेतां देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्रीयांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यांतही तीची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते.
माझं ‘C’ section झालं. Delivery नंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत पण तरीही सीझर होण्याची माझी कारणे खालील प्रमाणे...
१. My pelvic bone structure and baby’s head was not in the proportion.
म्हणजेच माझा ओटीपोटाचे/कंबरेचे हाड/साचा आणि बाळाचे डोके हे समान मापाचे नव्हते.
बाळाचे डोके हे मोठे असल्याकारणाने गर्भारपणात कितीही व्यायाम किंवा योग्य आहार घेतलात तरीही अशा वाढ झालेल्या बाळांची normal delivery शक्य नसते.
यांचे कारण अनुवंशिकता.
My baby’s head was bigger than my bone structure which is impossible to change even if you exercise or have perfect diet.
२. An umbilical cord that is wrapped around a baby's body twice so my baby couldn’t fix himself in my pelvis.
बाळाच्या भोवती दोनदा नाळ गुंडाळली गेली जी emergency नव्हती पण त्यामुळे त्याला बाहेर येणे किंवा खाली घसरणे केवळ अशक्य होते.
Pregnancy diet, Pregnancy मधील व्यायाम हे चोख पार पाडून मीही normal delivery होण्याच्या प्रयत्नांतच होते आणि normal साठीच प्रयत्न करायला हवा परंतु
कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलीव्हरीही तितकीच normal आणि नैसर्गिक आहे त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. Normal असो वा C section,
बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे.