मुंबई : सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे अनेकदा कलाकारांच्या आयुष्य़ातील काही न पाहिलेले पैलू पाहण्याची संधी चाहत्यांना मिळते. अनेकदा हे पैलू पाहता पाहता अशी एखादी गोष्ट समोर येते ज्यामुळं आपल्या भुवयाही उंचावतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच असंच लक्ष वेधलं आहे अभिनेत्री, व्हीजे अनुषा दांडेकर हिनं. सोशल मीडियावर चाहत्यांशी एका चॅटच्या माध्यमातून संवाद साधताना तिनं काही प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये काही प्रश्न हे तिच्या खासगी आयुष्यातील होते. 


एका प्रश्नामुळे अनुषानं तारुण्यात केलेली एक गोष्ट सर्वांसमोर आली. ही गोष्ट म्हणजे तिच्याकडून झालेल्या फसवणुकीची. आपण कधी कोणाची फसवणूक केली आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना अनुषानं या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी दिलं. 


वयाच्या 20 व्या वर्षी आपण एका व्यक्तीला फसवलं होतं असं सांगताना अनुषानं लिहिलं, 'त्यावेळी मीच स्वत:च्या आयुष्याबाबत काही गोष्टींचे निर्णय़ घेत होते. मी काही कारणं देत नाही पण, मी खरं तेच सांगतेय. मी लगेचच याबाबत त्या व्यक्तीला सांगत पुढच्या क्षणी ब्रेकअप केलेला. त्यानंतर आम्ही आता चांगले मित्र आहोत.'


ज्या व्यक्तीसोबतच्या नात्यात अनुषानं हे सारं केलं ते तिचं तारुण्यातील वय होतं. अनेकदा या वयामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असतात. समाजात वावरण्याचं भान येत असतं अशा परिस्थितीतच असल्यामुळं अनुषा कोणत्याही प्रकारच्या कमिटमेंटमध्ये अडकली नव्हती. 



अनुषाच्या खासगी आयुष्याचा हा पैलू सर्वांसमोर येतानाच दुसरीकडे तिच्या जीवनाशी निगडीत आणखी एक बाब समोर आली आहे. ही बाब म्हणजे करण कुंद्रा आणि तिच्या रिलेशनशिपमधील वादळ.


'बिग बॉस'मधील स्पर्धक अभिनेता करण कुंद्रा यानं काही दिवसांपूर्वीच अनुषासोबतचं त्याचं नातं नाव न घेता सर्वांपुढे ठेवलं होतं. दरम्यान, अनुषा या रिअॅलिटी शो चा एक भाग होणार असल्याचंही म्हटलं गेलं. पण, आता तिनंच याबाबतचं चित्र स्पष्ट करत असं काहीच होणार नसल्याचं सांगितलं.