मुंबई : नव्वदच्या दशकात मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने अभिनेत्री अश्विनी भावे यांनी रसिकांची मनं जिंकली. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक आहेत, हे चाहत्यांना माहीत आहेच. पण, अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण जपलं आहे. त्यांनी अमेरिकेत होळी हा सण साजरा केला आहे. होळीच्या सण म्हटलं की पुरणपोळीचा बेत घराघरात पाहायला मिळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी पुरणपोळी बनवतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांनी काही मिनीटातचं उत्तम प्रतिसाद दिला आहे. अश्विनी भावे यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात



अश्विनी भावे सध्या सिनेमांमध्ये खूप कमी काम करतात. पण त्यातही त्या खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकतात. त्यांच्या 'मांजा' हा सिनेमा अलीकडे प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.


अश्विनी सिनेमांमध्ये कमी काम करत असल्या तरी त्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्या त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. इतकंच नाही तर सोशल मीडियाद्वारे त्या त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात.अश्विनी भावे यांनी मराठी परंपरा जपत अमेरिकामध्ये पुरणपोळीचा बेत केला आहे. सोशल मीडियावर अश्विनी भावे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे