Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदानं नुकतीच कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' या शोमध्ये त्यानं शिल्पा शेट्टी संबंधीत एक किस्सा शेअर केला आहे. त्यात त्यानं सांगितलं की जेव्हा त्याला गोळी लागली होती तेव्हा शिल्पा शेट्टी त्याला भेटण्यासाठी रुग्णालयता आली होती. तेव्हा शिल्पानं मस्करीत गोविंदाला गोळी लागण्याविषयी प्रश्न विचारला की सुनीता घरी नव्हती तर गोळी कोणी झाडली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटफ्लिक्सवरील या शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओचा एक आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित होत आहे. या एपिसोडमध्ये गोविंदा, शक्ति कपूर आणि चंकी पांडे एकत्र दिसले. यात गोविंदानं शिल्पा शेट्टी संबंधीत एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. त्यात त्यानं म्हटलं की कपिल, जेव्हा शिल्पा मला भेटायला रुग्णालयात आली होती तेव्हा तिनं मला विचारलं की ची-ची तुला गोळी कशी लागली? सुनीता कुठे होती? मी उत्तर देत तिला म्हणालो की सुनीता तेव्हा मंदिरात गेली होती. उत्तर ऐकताच शिल्पानं मस्करीमध्ये सांगितलं की जर सुनीता घरी नव्हती तर गोळी कोणी झाडली? हा किस्सा ऐकूण तिथे उपस्थित असलेले सगळ्यांना हसू अनावर झालं. 


हेही वाचा : गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'


1 ऑक्टोबर रोजी सकाळी गोविंदा एकटाच घरी होता. त्यावेळी रिवॉल्वर साफ करत असताना चुकून ती मिसफायर झाली आणि त्याच्या पायाला लागली. त्यानंतर मुंबईच्या क्रिटी केयर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिच्या सर्जरीनंतर त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा त्याची पत्नी सुनीता आहूजा ही जयपुरमध्ये होती. गोविंदा-शिल्पानं अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. गोविंदा आणि शिल्पा शेट्टीनं अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघांचा पहिला चित्रपट आग हा 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 1995 मध्ये दोघं हथकडी आणि गॅम्बलर या चित्रपटात दिसली होती. तर 1996 मध्ये छोटे सरकारमध्ये ते दिसले होते. तर यांचा अखेरचा चित्रपट हा परदेसी बाबू होता. दरम्यान, या सीजनमुळे बऱ्याच वर्षांनंतर कृष्णा अभिषेक आणि गोविंदा एकत्र स्क्रिनवर दिसणार आहेत.