मुंबई : आजारपण कोणालाही नकोसंच वाटतं. मुळात शत्रू कितीही मोठा असो, त्यालाही आजारपण येऊ नये अशीच इच्छा प्रत्येजण मनी बाळगतो. कारण, आजारपणातील संघर्ष माणसाला एकतर कणखर करतो, किंवा मग सर्वतोपरी कमकुवतही करून जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशाच आजारपणाशी अतिशय सकारात्मकपणे झुंज देतेय अभिनेत्री छवी मित्तल (Chhavi Mittal). काही दिवसांपूर्वीच छवीची स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली. ज्यानंतर आता ती यातून सावरताना दिसत आहे. 


सोशल मीडियावर छवीच्या फॉलोअर्सना तिचा हा संपूर्ण प्रवास पाहता येत आहे. शस्त्रक्रिया झालेली असली तरीही छवी अद्यापही वेदनेतून मात्र सावरली नाही. व्यायायमशाळेत जाऊन तिथं घाम गाळणं तिलाही आवडतं. पण, वेदनांमुलं तिला हे शक्य नाही. (cancer surgery )


आपला दिवस कसा गेला हे सांगताना आजारी पडल्याचीच खंत तिनं व्यक्त केली. अवघ्या एका टाक्यामुळं मला प्रचंड वेदना होत असल्याचं सांगत यातूनही आपण सावरु असं तिनं सांगितलं. वेदनांचा हा काळही लवकरच संपेल यासाठी छवी आशावादी आहे. (cancer awareness)



आपण किती वेदना सहन करत आहोत हे मुलीला सांगण्याची मुळीच इच्छा नसल्याचंही छवीनं सांगितलं. पहिल्यांदा जेव्हा तिनं मुलीला आपल्या तब्येतीविषयी सांगितलं तेव्हा तिच्या मनात असंख्य प्रश्न होते. कॅन्सरनं शरीरावर घाला घातलेला असतानाच छवी सकारात्मकतेची साथ सोडताना दिसत नाहीये. ज्यामुळं हा प्रवास खडतर असला तरी अशक्य नाही हेच ती सिद्ध करत आहे.