Chhavi Mittal lashed out at trolls: अभिनेत्री छवी मित्तल (Chhavi Mittal) आपल्या बिनधास्त आणि बोल्ड स्वभावामुळे ओळखली जाते. तिचा हा बिनधास्तपणा सोशल मीडियावरही (Social Media) दिसत असतो. यामुळेच जेव्हा कोणी तिला ट्रोल करण्याचं प्रयत्न करतं तेव्हा ती त्यांनी सडेतोड उत्तर देते. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने तिला आपल्या मुलांच्या ओठावर किस करत असल्याने ट्रोल केलं होतं. यानंतर तिने अनेक फोटो टाकत त्याला उत्तर दिलं. पण एकदा एका व्यक्तीने तिच्या आजारावर असंवेदनशीलपणे भाष्य केलं होतं. त्यालाही तिने असंच उत्तर दिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छवी मित्तलला (Chhavi Mittal) ब्रेस्ट कॅन्सर (Cancer) झाला असून त्याने त्याच्यावर मात केली आहे. छवी मित्तल एकीकडे या गंभीर आजाराचा सामना करत असताना दुसरीकडे तिला काही असंवेदनशील ट्रोलिंगचाही सामना करावा लागत होता. दरम्यान अशाच एका ट्रोलरला तिने सडेतोड उत्तर दिलं होतं. या ट्रोलरने छवीला 'ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर स्तन कापत नाहीत का?' अशी विचारणा केली होती. 


छवी मित्तलने इन्स्टाग्राला तिला पाठवलेल्या काही कमेट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. यामध्ये एका युजरने तिला स्तन कापत नाहीत का? अशी विचारणा केली होती. यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान छवी मित्तलने अशी असंवेदनशीलता अद्यापही सुरु आहे असं सांगितलं होतं. तसंच एक पोस्ट शेअर केली होती. 


"मी नुकतंच सुट्यांचे काही फोटो, रिल शेअर केले होते. यामदरम्या या कमेंटने माझं लक्ष वेधून घेतलं. माझी ब्रेस्ट एक वस्तू असल्याप्रमाणे चर्चा केली जात आहे. मी ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली असून, हा अवयव जिवंत ठेवण्यासाठी लढा दिला आहे. तुमची कुतुहूलता मी समजू शकते, पण ही असंवेदशीलता दुखावणारी आहे असं वाटत नाही का?," अशी विचारणा छवी मित्तलने केली. 



"सेलिब्रिटीही माणसं आहेत. त्यांनाही सामान्याप्रमाणे भावना आहेत. त्यांनाही इतरांप्रमाणे कॅन्सर होतो. तेही त्यांच्याप्रमाणे जगतात किंवा मृत्यू पावतात. त्यामुळे जगण्याच्या सर्वात मोठ्या लढ्याबद्दल अशा असंवेदनशील टिप्पणीची कोणालाच सवय नाही," असं छवी मित्तलने म्हटलं आहे. दरम्यान यावेळी छवी मित्तलने बेस्ट कॅन्सर झाल्यास नेमकं कशाप्रकारे उपचार आणि सर्जरी केली जाते हे समजावून सांगितलं आहे. 


"कॅन्सरवर मात करणं माझ्यासाठी एक आयुष्य बदलणारा अनुभव होता. हे मी नवं आयुष्य जगत आहे. मला आता 7 महिने झाले असून अजूनही रोजच्या आयुष्यात काही गोष्टी करताना काही चूक नसताना होणारा त्रास पाहून मला रडायला येतं. पण मी पुढे वाटचाल करत आहे. कारण असा लढा देणारं शरीर आहे याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी उभे राहणाऱ्या सर्वांचे आभार." असं छवी मित्तलने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.