Tikli Row : राज्यात गेल्या काही दिवसांपासून संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी महिला पत्रकाराकडे टिकली (Tikli row) लाव म्हणत केलेल्या अजब मागणीमुळे वादाला तोंड फुटलं आहे. त्यातच आता अभिनेत्री चिन्मयी सुमीतच्या (chinmayee sumeet) नावाचाही समावेश झाला आहे. नुकतंय एका कार्यक्रमादरम्यान चिन्मयीनं अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य करत राजकीय नेतेमंडळींसोबत टिकलीसाठी आग्रही असणाऱ्यांच्याही नजरा वळवल्या. (Actress Chinmayee Sumeet on Tikli row demands more marathi schools instead)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंकू आणि टिकलीसाठी आग्रही असणारे मातृभाषेचा आग्रह धरताना दिसत नाहीत असं म्हणत प्रश्नार्थक आणि संतप्त सूर चिन्मयीनं आळवला. मराठी शाळांपुढे असणारे प्रश्न, विद्यार्थीसंख्या कमी असल्याच्या कारणानं बंद होणाऱ्या मराठी शाळा आणि त्यांचं धोक्यात आलेलं अस्तित्वं या आणि अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ती बोलत होती.


मराठी भाषेसाठी एकत्र येऊन लढा द्या...


'मराठी भाषा आपण टिकवल्या पाहिजे'च्या सदिच्छादूत असणाऱ्या चिन्मयीनं यावेळी आपलं आणि आपल्या मुलांचं शिक्षण मराठीतूनच झाल्याची बाब अधोरेखित केली. प्रत्यक्षात मात्र सरकार दरबारी मराठी शाळांचे प्रश्न मांडताना त्याची आणखी एक बाजू आपल्याला कळली असंही ती म्हणाली.


वाचा : 'कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलतो'; शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य!


मराठी भाषा आणि मराठी शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी या भाषेच्या संवर्धनासाठी सक्रिय असणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन लढा देत तिला आर्थिक मूल्य मिळवून द्यावं असं आव्हान तिनं यावेळी केलं.


टिकली प्रकरण नेमकं काय आहे?


काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे (Sambhaji bhide Tikli row) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. तिथून परतत असताना एका महिला पत्रकारानं प्रतिक्रिया घेण्यासाठी म्हणून त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण, काही बोलण्याआधीच त्य़ांना रोखत टिकली न लावल्यामुळं भिडेंनी प्रतिक्रिया दिली नाही.


स्त्री ही भारतमातेचं प्रतीक आहे आणि भारतमाता विधवा नाही, कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं, ज्यानंतर अनेकांनीच त्यांच्याप्रती रोष व्यक्त केला.