मुंबई : अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद फॉऊंडेशनकडून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून दीपालीने लोकांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पूरग्रस्त भागातील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतल्याचंही दिपालीने जाहीर केलं आहे. प्रत्येक मुलीच्या नावाने 50 हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे. अशा एकूण 1000 मुलींचा विवाह करून देण्याची जबाबदारी दीपालीने स्वीकारली आहे. 


याआधीदेखील अहमदनगरमधल्या साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू करावं या मागणीसाठी दीपालीने बेमुदत उपोषण केलं होतं. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर दीपालीने आपलं उपोषण मागे घेतलं. या योजनेमुळे श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातल्या दुष्काळी ३५ गावांना फायदा होणार आहे.