`या` फोटोवरून अभिनेत्री दीपिका पादुकोण झाली ट्रोल
`फॅशन` आणि प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते. काहींना ती `कूल` वाटते तर काही जण `अजब स्टाईल स्टेटमेंट`मुळे ट्रोल होतात.
मुंबई : 'फॅशन' आणि प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते. काहींना ती 'कूल' वाटते तर काही जण 'अजब स्टाईल स्टेटमेंट'मुळे ट्रोल होतात.
दीपिका चा खास गाऊन
लक्स गोल्डन रोज अवॉर्ड २०१७ मध्ये नुकतीच अभिनेत्री दीपिका पादुकोणही सहभागी झाली होती. या सोहळ्यात दीपिकाने सोनेरी रंगाचा एक खास गाऊन घातला होता. मात्र नेमकी याच कारणावरून दीपिका ट्रोल झाली आहे.
A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on
सोनेरी रंगाच्या दीपिकाच्या गाऊनची तुलना 'कॅडबरी'च्या सोनेरी रॅपरशी केली आहे.
नेटकर्यांनी केले ट्रोल
दीपिकाचे फोटो पाहिल्यानंतर तिच्या कपड्याप्रमाणेच तिची हेअरस्टाईलदेखील ट्रोल होण्याचे कारण ठरलं आहे.
अनेक सेलिब्रिटी झाल्या ट्रोल
काही वर्षांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झालेली ऐश्वर्या रायदेखील जांभळ्या रंगाच्या लिपस्टिकमुळे ट्रोल झाली होती.
दीपिका आणि ऐश्वर्याच्या या यादीमध्ये सना फतिमा शेख, अमिषा पटेल, प्रियांका चोप्रा यांचादेखील समावेश आहे.