मुंबईः मुंबईहून  दिल्लीला जाणारं 'विस्तारा' एअरलाईन्सचं विमान शुक्रवारी रात्री अचानक जयपूरमध्ये लँडिंग करण्यात आलं आणि प्रवाशांना थांबवण्यात आलं. जवळपास 3 तास प्रवासी विमानातच बसून होते आणि त्यानंतर त्यांना विमान रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री दिया मिर्झा ही 'विस्तारा' एअरलाईन्सच्या UK940 या फ्लाईटमधून मुंबईहून दिल्ली प्रवास करत होती मात्र अचानक हे विमान जयपूरमध्ये उतरवण्यात आलं. खराब हवामानामुळे हे विमान जयपूरमध्ये उतरवण्यात आलं अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली मात्र एअरलाईन्सने कोणतीही सुविधा न पुरवल्याने दिया मिर्झाने ट्विटद्वारे संताप व्यक्त केला.



दिया मिर्झाने ट्विट करून कंपनीकडून मिळालेल्या वागणुकीची माहिती दिली आहे. रात्री 11 वाजता फ्लाईट जयपूरमध्ये लँड झाल्यानंतर पहाटे 2 वाजेपर्यंत आम्हाला विमानात बसवून ठेवलं त्यानंतर फ्लाईट रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आणि प्रवाशांना दिल्लीला जाण्याची पुढची सोय स्वतःच करण्यास सांगितलं.



 


 दरम्यान एअरलाइन्स किंवा विमानतळ प्राधिकरणातील कोणीही त्यांना मदत केली नाही. या दरम्यान त्यांना त्यांचं सामान सुद्धा गहाळ झालं. दियाप्रमाणेच इतर प्रवाशांनीही 'विस्तारा' एअरलाईन्सवर संताप व्यक्त केला आहे.


दिया ग्रेटर नोएडा इथं 'धक धक' सिनेमाच्या चित्रीकरणसाठी जात होती. यादरम्यान तिच्यासोबत तिचा मुलगा अव्यान आझाद रेखी देखील होता.



'धक धक' सिनेमाबद्दल बोलायचं तर फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह आणि संजना संघी यांच्याही भूमिका आहेत, अभिनेत्री तापसी पन्नूने सह-निर्मिती केली आहे आणि तरुण दुडेजा दिग्दर्शित आहे.