Actress Lost Her 23 Old Daughter Shares Emotional Post : छोट्या पडद्यावर आणि चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री दिव्या सेठ यांचं आयुष्य जसं अपूर्ण राहिलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी तिची एकूलती एक लेक मिहिका शाहला कायमचं गमावलं. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूनं सगळ्यांना धक्का बसला. ती फक्त 23 वर्षांची होती आणि तिनं तिची स्वप्न पाहिली होती. पण आता घरात सगळं शांत झालं आहे. तर लेकीच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर आता दिव्या सेठ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्या सेठ यांनी लेक मिहिका शाहच्या मृत्यूच्या 7 दिवसांनंतर पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती तिच्या लेकीसोबत पोज देताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर प्रेम आणि आनंद दिसतोय. पण आता या फोटोसोबत दिव्या यांनी हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट शेअर केली आहे. दिव्या सेठ यांनी या पोस्टमध्ये लिहिलं की 'माझी होण्यासाठी मी तुझी आभारी आहे.' 



दिव्या यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिची सांत्वन केली आहे. आलिया भट्टची आई सोनी राजदाननं कमेंट करत म्हटलं की 'दिव्या, तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासोबत खूप वाईट झालं. अशा वेळी शब्दात काही मांडता येत नाही. तू आणि मिहिका कायम आमच्या आठवणीत राहा. प्रामाणिकपणे सांगायचे म्हटलं तर हे समजनं खूप कठीण आहे... तुला जगातलं संपूर्ण प्रेम पाठवते.' त्याशिवाय अनेक सेलिब्रिटींनी दिव्या यांची सांत्वन करणारी कमेंट केली आहे.


दिव्या सेठ यांनी पाच दिवस आधीच लेक मिहिकाच्या प्रार्थना सभेशी संबंधीत पोस्ट शेअर केली होती. ज्यानंतर सगळ्यांना ही माहिती मिळाली. मीहिका आता या जगात नाही. मीडिया रिपोर्ट्सनुासर, मिहिका हे बऱ्याच काळापासून गंभीर आजाराशी झुंज देत होती. मिहिराला ताप आला होता आणि नंतर पक्षाघाताचा झटका आला आणि 5 ऑगस्ट रोजी तिनं अखेरचा श्वास घेतला. 


हेही वाचा : 'थिएटरमध्ये येऊन तुमची लायकी दाखवा...'; डेव्हिड धवनचं OTT कलाकारांना चॅलेंज


दरम्यान, दिव्या यांनी मुलगी मिहिका आणि आई सुष्मा सेठ यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ते तिघेही आनंदात दिसत होते. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं होतं की 'डीएनए एकमेव सत्य आहे, इतर सगळं मेहनतीचं काम आहे. मातृत्वाचे आभार'.