Elli Avrram Trolled: सध्या बॉलिवूडमध्ये नानातऱ्हेच्या पार्ट्या आणि फंग्शन्स (Bollywood Party) होत असतात. तेव्हा सेलिब्रेटींची एकच झुंबड पाहायला मिळते. या पार्ट्यांमधून सगळ्यांत जास्त चर्चा होते ती सेलिब्रेटींच्या कपड्यांची. त्यातून अभिनेत्रींच्या कपड्यांची (Bollywood Celebrity Trolled) आणि त्यांच्या फॅशनची मोठी चर्चा होऊ लागते आणि सोशल मीडियावर त्यांच्याच कपड्यांच्या चर्चांना उधाण येतं. अनेकदा या अभिनेत्री ट्रोलही होतात. सध्या अशाच एका पार्टीतल्या एका लुकमुळे एक लोकप्रिय अभिनेत्रीला आपल्या कपड्यांमुळे जबर ट्रोल व्हावं लागलं आहे. या अभिनेत्रीचा पांढरा ड्रेस पाहून नेटकरी तिला सोशल मीडियावर ट्रोल करू लागले आहेत. (actress elli avrram gets trolled of her white revealing dress netizens reacts)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एली अवराम (Elli Avrram trolled) ही अशीच एक अभिनेत्री आहे जिनं बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आजकाल सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा असते. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त तिची चर्चा होत राहते. तिच्या कपड्यांवरूनही ती अनेकदा ट्रोल झाली आहे. सध्या तिचा असाच एका फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती एक व्हाईट गाऊनमध्ये दिसते आहे. या गाऊन खूप डीपनेक (deep neck) आहे. त्यामुळे तिचा क्लिवेज दिसतो आहे. अशा लुकमुळे ती सोशल मीडियावर भयंकर ट्रोल झाली आहे. कुणी तिला उर्फी जावेद पार्ट टू असं म्हटलं आहे तर कुणी तिच्यावर तिच्या कपड्यांमुळे फार टीका केली आहे. सध्या तिच्या या फोटोंमुळे सगळीकडेच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. 


तिच्या या बोल्ड फोटोमुळे (Bold Photo) तिला भयंकर ट्रोल करण्यात आलं आहे कुणी तिला म्हटलंय, ताई जरा वरती कपडे घाला, तर अनेक जणांनी म्हटंलय की, असं कमी कपडे राहिलेच कसे अंगावर?. तर काहींनी, कळतं नाही ही दाखवतेय की लपवतेय तर काहींनी अशी कमेंट केलीये की नक्की काय झाकायचा प्रयत्न करतेय ही? 


नारंगी रंगाच्या बिकीनीमुळे ट्रोल 


मध्यंतरी तिनं भगव्या रंगांची बिकीनी परिधान केली होती. दीपिका पादूकोणच्या भगव्या बिकीनीचा (bikini) वाद सुरू असताना तिच्या या नारंगी रंगाच्या बिकीनीनं पुन्हा एकदा हलकल्लोळ माजवला होता. त्यामुळे तिची बरीच चर्चा झाली होती. सध्या या फोटोंमुळे तिला ट्रोलही करण्यात आले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एका स्विमिंग पूलमध्ये बसून तिनं हे फोटोज व्हायरल केले आहेत. तिच्या या फोटोंवर अनेकांनी पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह कमेंट्स आल्या आहेत.