Debina Bonnerjee Baby Girl : सध्या सिनेसृष्टीत आलिया आणि रणबीरच्या चिमुकलीचे खूप चर्चा आहे. ६ नोव्हेंबरला आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला (aalia ranbir baby girl) . आणि कपूर कुटुंबात आनंदाला उधाण आलं. संपूर्ण सिनेसृष्टीसुद्धा खूप खूप खुश आहे. आता आलिया रणबीर नंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने बाळाला जन्म दिला आहे. 
टीवी इंडस्ट्रीमधील फेमस कपल गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बनर्जी (Debina Bonnerjee)  आधीची मुलगी लियानाच्या जन्मानंतर काहीच महिन्यात पुन्हा एकदा आई बाबा झाले आहेत.  आज त्यांनी गोंडस कन्येला जन्म दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून देबीन बॅनर्जी आहे.  तिचा पती गुरमीत चौधरीने इंस्टाग्राम हँडलवर देबिना बोनर्जीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यावर मुलगी झाली आहे असे लिहिले आहे (gurmeet banerjee announced baby girl) .


त्याचबरोबर कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे - आमच्या मुलीचे या जगात स्वागत आहे. जसे आपण पुन्हा पालक झालो आहोत. यावेळी आम्ही तुमच्याकडून गोपनीयतेची अपेक्षा करतो. कारण आमचे बाळ जरा लवकरच जगात आले आहे. तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत राहा.


थोड्याच दिवसांपूर्वी देबिनानं आपलं मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे जे तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टशी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आपलं मॅटर्निटी शूट करताना देबिनानं बिहाईंड द सीन्सचंही शूट पोस्ट केलं आहे.


या फोटोमध्ये देबिना खुपच सुंदर दिसते आहे. असे ग्लॅमरस मॅटर्निटी शूट पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहे. या व्हिडीओमध्ये देबिना ग्लॅमरस शिमर ग्रे गाऊनमध्ये बेबी बम्प फ्लॉल्ट (Debina Bonnerjee Baby Bump) करताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये देबिना खूपच स्टनिंग दिसत असून तिचे हे व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Debina Bonnerjee Video)