मुंबई : बॉलीवुड (Bollywood) चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) दर दिवशी नवनवीन कारणांनी चर्चेत असतात. कधी एखादं ट्विट, कधी एखादं वक्तव्य किंवा आणखी काही. रविवारी मात्र त्यांच्या कृत्यानं अनेकांचाच रोष ओढावल्याचं म्हटलं गेलं. कारण ठरलं ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री आणि मॉडेल इनाया सुलताना हिच्यासोबत राम गोपाल वर्मा या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. असं म्हटलं जातंय की या व्हिडीओमध्ये ते मद्यधुंद अवस्थेत इनायासोबत डान्स करत आहेत. इनायाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला राम गोपाल वर्मा यांनी हजेरी लावली होती, तेव्हाचाच हा व्हिडीओ असल्याचं कळत आहे. 


सोशल मीडियावर एकिकडे हा व्हिडीओ व्हायरल होताच दुसरीकडे लोकांनी त्यांच्या या अश्लील नृत्यावर प्रश्नचिन्हं उभी करण्यास सुरुवात केली. अतिशय विचित्र पद्धतीने ते या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहेत हे पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची एकट लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. 


sushant singh rajput चा प्रोफाईल फोटो बदलताच चाहत्यांना धक्का; हे नेमकं कोणी केलं? 


सोशल मीडियावर एक व्हिडीओ अशा पद्धतीनं व्हारल होत असून, त्यामधील मद्यधुंद व्यक्ती आपण असल्याचं समजून चाहते, नेटकरी संताप व्यक्त करत आहेत हे पाहून राम गोपाल वर्मा यांनी एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी या व्हिडीओतील व्यक्ती मी नसून ती मुलगी इनाया सुलताना नसल्याचं म्हटलं आहे. चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची शपथ घेत राम गोपाल वर्मा यांनी हे ट्विट केलं. त्यामुळं आता त्यातील सत्यता किती याची शहानिशा करणं कठीणच. 






दरम्यान, एकिकडे सोशल मीडियावर तो मी नव्हेच असं म्हणत राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तर, दुसरीकडे खुदद् इनायानं ट्विटरवर फोटो पोस्ट करत यंदाचा वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असल्याचं सांगितलं. कलाकारांच्या या पोस्ट, त्यांची वादग्रस्त कृत्य पाहून चाहत्यांचं डोकं चांगलंच भंडावलं आहे.