मुंबईः बॉलीवूडमध्ये आता हॉटनेस चांगलाच वाढला आहे. बॉलीवूड अभिनेत्रींचे बिकीनी लुकमधील फोटो हे सर्वात जास्त चर्चेत असतात. सध्या बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रीने नुकतेच तिचे हॉट फोटोज शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडची सुपरबोल्ड आणि हॉट अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या चाहत्यांसाठी बिनधास्त असे बोल्ड फोटोशूट करते आणि सोशल मीडियावर पोस्ट करते. तिचे सगळेच फोटो हे सुपरबोल्ड असतात. आपल्या फॅन्सचे हार्टबीट्स कसे वाढावायचे याची तिला चांगलीच आयडिया आहे. 


ईशा गुप्ताचे फोटो पाहून चाहते कॉमेंट्स करणं थांबवू शकत नाहीत. अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केलेल्या हॉट फोटोंनी वातावरण चांगलेच गरम केले आहे. आपले हे फोटोज तिने विकेंडलाच पोस्ट केले. तिने तिच्या फोटोंजमधून ट्रान्सपरंट कपडे घातले आहेत. ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


नुकताच तिने एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती एका ट्रान्सपरंट गाऊनमध्ये आहे. त्या फोटोतून ती खिडकीजवळ पोज देताना दिसली. हा फोटो शेअर होताच तिच्या इन्स्टावरच्या कमेंट सेक्शनला लोकांच्या कमेंट्सचा अक्षरक्षः पाऊस पडू लागला. ईशाने ब्रॅलेस ड्रेस घातला आहे. फोटोमध्ये ईशा गुप्ताचा हा ड्रेस बॅकलेस आहे. आणखी बोल्ड दिसण्यासाठी ईशाने केसही मोकळे सोडले आहेत. 



 हा ड्रेस घालून ती खिडकीजवळ उभी राहून असा किलर लूक देत असल्याने काही चाहते घायाळ झाले आहेत तर काहींनी तिच्यावर जोरात टीका केली आहे. 



ईशा गुप्ताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ईशा गुप्ताने तिचे हॉट फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे बोल्ड फोटो तिने शेअर केले आहेत. ईशा अलीकडेच 'आश्रम 3' मध्ये सोनियाच्या भूमिकेत दिसली होती. या वेब सीरिजमध्ये ईशा गुप्ताने बॉबी देओलसोबत बरेच इंटिमेट सीन्स दिले होते.