मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. काही काळापूर्वी तिने एका मिस्ट्री बॉयसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये ती त्याच्यासोबत खूप जवळिकता साधताना दिसत आहे.  पुन्हा एकदा अभिनेत्रीचा  स्पेशल मित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना जाणून घ्यायचं आहे की, फोटोत जान्हवीसोबत दिसणारा मुलगा कोण आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाह्नवी कपूरचा व्हिडिओ
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने जसं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं तसं. लगेच तिला मोठे चित्रपट मिळू लागले आणि लोकांनी तिच्या कामाचं खूप कौतुकही केलं. जान्हवीचं नाव तिचा सहकलाकार ईशान खट्टरसोबत जोडलं गेलं. तिला ईशानसोबतही अनेकदा स्पॉट केलं गेलं होतं. पण कालांतराने त्यांचे मार्ग वेगळे झाले. पण दरम्यान, अभिनेत्रीचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका मुलाच्या अगदी जवळ दिसत आहे.


हा मिस्ट्री बॉय कोण आहे
या व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा अक्षत राजन आहे. ही व्यक्ती अभिनेत्रीचा खूप चांगला मित्र आहे. जान्हवी कपूरने काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एका पार्टीचा फोटो शेअर केला होता. या पार्टीत त्याच्यासोबत तिची धाकटी बहीण खुशी कपूरही दिसतेय. जान्हवीच्या या फोटोत आणि व्हिडिओमध्ये अभिनेत्री पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.



दुसरीकडे, खुशी कपूर काळ्या रंगाच्या शर्टमध्ये तिचा लूक फ्लाँन्ट करत आहे. यासोबतच तिने राखाडी रंगाच्या ओव्हरसाईज ब्लेझरसह काळा शर्ट आणि पॅन्ट घातलीये. यासोबतच अक्षत जान्हीवीला आपल्या मिठीत घेताना दिसत आहे. तिच्या या फोटोला कॅप्शन देताना जान्हवीने FAM लिहिलं आहे.