Kajol Devgan : 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात माधुरीने निशाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडली होती. या चित्रपटात तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता 'हम आपके हैं कौन' मधील माधुरी दीक्षितचा लूक तिची मैत्रिण अभिनेत्री काजोलने कॉपी केला आहे. अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 


काजोलने कॉपी केला माधुरी दीक्षितचा लूक


अभिनेत्री काजोल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अभिनयासोबत ती तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना आकर्षित करत असते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतेच तिने माधुरी दीक्षितचा 'हम आपके हैं कौन' या चित्रपटातील लूक कॉपी केला आहे. तिने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या नवीन लुकची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. 



या फोटोंमध्ये काजोल निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. तिचा हा लूक निशा म्हणजेच  'हम आपके हैं कौन'  मधील माधुरी दीक्षितला समर्पित आहे. ज्याची माहिती तिने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिली आहे.  तिने म्हटलं आहे की, Hum Aapke Hai Kaun..Ode to the OG. काजोलचा हा लूक माधुरी दीक्षितच्या 'हम आपके हैं कौन' मधील दीदी तेरा देवर दिवाना या गाण्यातील आहे. माधुरीप्रमाणेच काजोलने देखील या निळ्या रंगाच्या साडीमध्ये चाहत्यांना घायाळ केलं आहे. 



माधुरी दीक्षितचा सर्वात हिट चित्रपट


30 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला माधुरी दीक्षितचा 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट सर्वात हिट ठरला आहे. या चित्रपटात तिची सलमान खानसोबतची जोडी चांगलीच चर्चेत राहिली आहे. या चित्रपटाने त्यावेळी जवळपास 74 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. यासोबतच हा चित्रपट 90 च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.