मुंबई : शाहरुख खान आणि काजोल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले, जे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. शाहरुख आणि काजोल शेवटचे 'दिलवाले' चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान असं काही घडले की शाहरुख खानच्या जीवावर बेतलं, पण त्यावेळी काजोलने त्याचा जीव वाचवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखचा जीव काजोलने वाचवला


वास्तविक, 'दिलवाले' चित्रपटातील 'गेरुआ' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान शाहरुख डोंगरावरून खाली पडण्यापासून बचावला. या गाण्याचा एक मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामध्ये दोन्ही स्टार्स गाण्याच्या शूटिंगबद्दल बोलताना दिसत आहेत.


शाहरुख खान आणि काजोल डोंगराच्या बाजूला असलेल्या धबधब्यासमोर शूटिंग करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. काजोल समोर उभी आहे आणि शाहरुख गुडघ्यावर बसून हात पसरून माफी मागताना दिसत आहे. तो उठताच त्याचा तोल जातो, पण काजोल त्याचा हात पकडून त्याला खेचते. अशा प्रकारे काजोलने शाहरुखला वाचवले.



शाहरुखचा जीव वाचला


व्हिडिओमध्ये या घटनेबद्दल बोलताना शाहरुख खान काजोलला म्हणाला, 'खूप खूप धन्यवाद. मी माझे जीवन तुझे ऋणी आहे. माझे हे आयुष्य आता तुझ्या नावावर आहे.



शाहरुख खान आणि काजोल खूप चांगले मित्र आहेत, अशी माहिती आहे. अनेक प्रसंगी दोघांची मैत्री स्पष्टपणे दिसून आली आहे. शाहरुख आणि काजोलने 'कभी खुशी कभी गम', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'माय नेम इज खान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.