....नाहीतर काजोलचं नावं असतं `Mercedes`; त्यामागचं कारण तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल
जर काजोलचे नाव `काजोल` नसते आणि दुसरेच काहीतर असते तर...
मुंबईः बॉलीवूड अभिनेत्री काजोलने नुकतीच आपली इंडस्ट्रीमधील 30 वर्षांची कारकीर्द पुर्ण केली आहे. आपल्या या प्रदीर्घ करिअरमध्ये तिने अनेक उत्तोमोत्तम चित्रपट दिले आहेत. तिच्या या कारकिर्दीत तिला 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कारही प्राप्त झाला आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएयें' या चित्रपटामुळे काजोलला वेगळी ओळख मिळाली. तेव्हापासून काजोलला आपण त्याच नावाने ओळखत आहोत पण जर काजोलचे नाव 'काजोल' नसते आणि दुसरेच काहीतर असते तर...
काजोल यांचे वडिल सोमू मुखर्जी यांना मात्र काजोल हे नाव ठेवण्यापुर्वी एक अजब नाव सुचले होते आणि ते नावं होते 'मर्सिडिज'. होय, असे नावं ऐकून कोणालाही विचित्र वाटेल परंतु हे खरे आहे. काजोल यांना लहानपणापासूनच गाड्यांची आवड होती. तेव्हा काजोलचे वडिल चक्क काजोलचेही नावं 'मर्सिडिज' या मोठ्या कार ब्रॅन्डचे नाव ठेवणार होते.
खुद्द काजोलनेच हा किस्सा सांगितला होता. जर इतरांच्या मुलाच्या नावावर मर्सिडिज कार होऊ शकते तर माझ्या मुलीचे नाव मर्सिडिज का असू शकत नाही? असे मतं काजोलच्या वडिलांनी सांगितले होते. तेव्हा सोमू मुखर्जी म्हणजेच काजोलच्या वडिलांच्या या निर्णयाला काजोलची आई तनुजा यांनी प्रचंड विरोध केला होता आणि त्यांनीच काजोल यांचे नाव 'काजोल' असे ठेवले.
याबद्दल अधिक खुलासा करताना काजोलने सांगितले की, ''खरंतर मला गाड्यांची खूप हौस आहे. त्यातून मला 'मर्सिडिज' ही गाडी खूप आवडते. जेव्हा मला कळलं की माझे बाबा माझं नावंही 'मर्सिडिज' ठेवणार आहेत तेव्हा मलाही प्रचंड आनंद झाला होता. परंतु माझ्या आईला हे मान्य नव्हते. माझी आई फारच कडक शिस्तीची आहे. तिने याला विरोध केला आणि माझे नावं 'काजोल' असे पडले.
अभिनेत्री काजोल सध्या अजून एका कारणासाठी चर्चेत आहे आणि ते म्हणजे काजोलचे पती आणि अभिनेते अजय देवगण यांना 'तान्हाजी' चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार. त्यामुळे सध्या त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.