मुंबई :  बॉलिवूडमधील प्रचंड चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रानौत. तिच्या लोकप्रियते इतकीच तिची सगळीकडे चर्चा असते. नुकताच पार पडलेल्या 'झी मराठी अवॉर्ड्स 2021' मध्ये देखील कंगनाने हजेरी लावल्याची चर्चा सुरु आहे. पण हे खरं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'झी मराठी अवॉर्ड्स 2021' मध्ये कंगना नाही तर श्रेया बुगडेने एका प्रहसनात कंगनाची भूमिका साकारली. पण तिने इतकी हुबेहूब कंगना साकारली कि सगळ्यांना खरोखर मंचावर कंगनाच आली आहे कि काय असा प्रश्न पडला, हे प्रहसन पाहताना तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांच्या हसून हसून डोळ्यात पाणी आलं.



यावेळी श्रेयाच्या मिमिक्रीचं सगळ्यांनी कौतुक देखील केलं. चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी सादर केलेल्या ह्या दिवाळी अधिवेशनात कंगना सोबत अनेक राजकारणी सहभागी झाले.