मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान प्रत्येक वेळी हटके लूक करताना दिसून येते. तिचा फॅशन सेन्स अनेकांना आवडतो. चाहते करीनाची ड्रेसिंग फॉलो करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, काही वेळा हटके स्टाईल करण्याच्या नादात ती ट्रोल देखील होते. आता असंच काहीसं करिना आणि तिची बहिण करिश्मा कपूरसोबत घडलं आहे. इंस्टाग्रामवर करीना कपूर खानचा एक व्हिडिओ शेअर समोर आला आहे.


यामध्ये करीना आणि करिश्मा कपूर आपल्या मुलांसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसत आहेत. यावेळी दोघी बहिणींनी केलेला लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 


दोघीही नाईट सूटमध्ये एअरपोर्टवर पोहोचल्या आहेत.करिनाने यावेळी पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड नाईट सूट घातला आहे. 


दुसरीकडे, करिश्मा कपूरने देखील करिना प्रमाणेच नाईट सूट परिधान केला आहे. तैमूर करिश्मासोबत बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी कपूर बहिणींच्या फॅशन स्टाईलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी या बहिणींना ट्रोल देखील केले आहेत.


दोघी बहिणी झोपेतून उठल्या आणि थेट एअरपोर्टवर पोहोचल्या असल्यांची प्रतिक्रिया अनेकजण सोशल मीडियाद्वारे देत आहेत. सोशल मीडियावर सातत्याने लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेत्रींचा हा लूक पाहून 'बेडरुम आणि एअरपोर्टमधला फरक कळतो का?' असा सवाल देखील नेटकरी करत आहेत. करीना गेल्या काही दिवसांपासून मालदीवमध्ये तिची मुलं आणि बहीण करिश्मासोबत क्वालिटी टाईम घालवत होती. आता ती मुंबईत परतल्याचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे.