मुंबई : कॅटरीना कैफ आणि सलमान खानच्या लग्नाची चर्चा अधूनमधून ऐकू येत असते. पण सध्या कॅटरीनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये कॅटरीना लग्नाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. कॅटरीनाने इंस्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोत ती नवरी दिसत आहे. माथ्यावर टीळा, नाकात नथ आणि साजेशा साडीमध्ये ती सुंदर दिसतेय.


नवा प्रोजेक्ट 



कॅटरीना कैफच्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' ची शुटींग नुकतीच संपली आहे. आता कॅटरीना नव्या प्रोजेक्टच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 


झीरो सिनेमा



आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने हा फोटो शेयर केलाय. लवकरच कॅटरीना आणि शाहरूख यांचा 'झीरो' सिनेमा येणार आहे.


त्यामुळे हा फोटो कॅटरीनाच्या लग्नातील नसून तिच्या आगामी सिनेमातील आहे.