Ketaki Dave: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता रसिक दवे यांचे काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्नी केतकी दवे यांनी स्वतःला या मोठ्या दुःखातून सावरले आहे. 65 वर्षीय रसिक यांच्यावर अनेक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र अखेर त्यांची मृत्यूशी असणारी झुंज अपयशी ठरली. रसिक दवे त्याच्या मृत्यूच्या बरोबर 2 दिवसांनी त्याच्या पत्नी केतकी दवे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री केतकी दवे यांनी पतीच्या निधनाच्या बरोबर दोन दिवसानंतर परत कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतला आहे. पतीच्या निधनानंतर इतक्या लवकर केतकी दवे यांनी हा निर्णय का घेतला याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परंतु असे असले तरी अद्याप कामावर लगेचच परतण्यामागचे कारण त्यांनी अस्पष्ट ठेवले आहे. 


नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान केतकी दवे यांनी सांगितले की, ''तूम्ही माझ्या दुःखात सहभागी होतायत ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. मला तूमचा हा पांठिबा पाहून आनंद झाला परंतु यावेळी तूम्ही माझ्या दुखात सामील होण्यापेक्षा तूम्ही माझ्या सुखात सहभागी व्हा. मी स्टेजवर जाईपर्यंत केतकी दवे आहे आणि एकदा मी स्टेजवर म्हणजे माझ्या भुमिकेत शिरले की मी केतकी दवे नसते. हेच अभिनेत्याचे वैशिष्ट्य आहे'', अशी माहिती त्यांनी दिली. 


पतीच्या निधनानंतर दोनच दिवसांनी कामावर परतलेल्या केतकीने २८ जुलैपासून एकही सुट्टी घेतली नाही. त्या सतत काम करत आहेत. वैयक्तिक गोष्टींचा व्यावसायिक जीवनावर परिणाम होऊ नये, असे केतकी यांचे मत आहे आणि ही शिकवण आपल्याला लहानपणापासून मी शिकत आले आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.