Kiara Advani Viral Video: अभिनेता असो वा अभिनेत्री, बॉलीवूडमध्ये कलाकरांना चित्रपट लगेच हिट झाल्यावर प्रसिद्धी मिळते. पण ही प्रसिद्धी त्यांच्याच डोक्यात जाते आणि त्यानंतर त्यांचा एटिट्यूड हा भलताच वाढलेला असतो, ही बाब अगदी खरी असली तरी दररोज व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यावर प्रेक्षक-चाहत्यांचा विश्वास बसेल. (actress kiara advani video viral netizens reacts compares with urfi javed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani Viral Video) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कियाराचा एटिट्यूड पाहून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. परंतु हा व्हिडीओ पाहून तर कियाराची तुलना सरळ उर्फी जावेदशी केली आहे. नक्की असं काय आहे या व्हिडीओत याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. (Kiara Advani Urfi Javed)


हेही वाचा - करीना, कतरिनानंतर आता 'ही' मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल


या व्हिडीओत कियारा चाहत्यांवर खूप भडकलेली पाहायला मिळते आहे. अनेक चाहते हे त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींसह सेल्फी (Selfie) काढण्यासाठी इतके आतूर असतात की त्यांच्या सेल्फीच्या नादात ते अनेकांनी धक्काबुक्की देतात आणि भांडणंही करतात. यांमुळे सेलिब्रेटींची अनेकदा पंचाईत होते. अनेकदा सेलिब्रेटींनाही याचा त्रास होतो. या व्हिडीओमध्ये कियारा याच गोष्टीमुळे चिडलेली पाहायला मिळते आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कियारा आपल्या चित्रपटाचे स्क्रिनींग पाहून झाल्यावर थिएटरमधून बाहेर पडते तेव्हा तिच्या आजूबाजूला चाहत्यांची एकच गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीतून तिचे चाहते तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की करतात हा प्रकार पाहून कियारा भयकंर चिडते आणि ज्येष्ठ नागरिक आहेत जे पाहा आपण काय करतोय याचं जरा भान तरी ठेवा म्हणून कियारा त्यांच्यावर भडकते. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. 


हेही वाचा - 'मी सुंदर नाही पण...' बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य


कियाराचा व्हिडीओ पाहून उर्फीचीच चर्चा? 


हा व्हिडीओ व्हायरल (Video) झाल्यावर मात्र कियाराचा हाे रौद्र रूप पाहून अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे परंतु कियारासोबत सेल्फी काढण्यासाठी ज्याप्रकारे लोकं गर्दी आणि धक्काबुक्की करत होते हे पाहून नेटकरी म्हणाले की अरे ही काय उर्फी जावेद आहे का हिच्यासोबत सेल्फी काढायला? कियाराचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या चर्चा बी-टाउनमध्ये सुरू झाल्या आहेत.