मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळात कायमच काही गोष्टी चर्चेचा विषय ठरतात. यामध्ये अधिक वाव मिळतो तो म्हणजे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याला. सध्या अशाच एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्याविषयीची अधिकृत माहिती समोर आली आहे. सेलिब्रिटी वर्तुळात अनेकदा नात्यांच्या बाबतीत शाश्वती नसते. पण, काही नाती मात्र याला अपवाद ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि पुलकीत सम्राट यांचं नातं असंच आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याच्या अनेक चर्चांनी डोकं वर काढलं होतं. अखेर क्रितीने या नात्याची कबुली दिली आहे मुख्य म्हणजे पुलकीला डेट करत असल्याचं तिने अधिकृतपणे सांगितल्यामुळे आता त्या दोघांनीही या बातमीला दुजोरा दिला असंच म्हटलं जात आहे. कोणालाही याविषयी माहित होण्यापूर्वी आपल्या पालकांना याची कल्पना असावी, असं क्रितीचं ठाम मत. 


'झी न्यूज'च्या वृत्तानुसार पुलकितसोबतच्या नात्याविषयी क्रिती सांगते, 'त्या अफवा नाहीत. आम्ही (एकेमेकांना) डेट करत आहोत. प्रामाणिकपणे सांगावं तर, मी कोणालातरी डेट करत आहे, हे माझ्या आई-वडिलांना सर्वप्रथन कळावं असं मला वाटतं. प्रत्येक गोष्टीविषयी बोलण्यासाठी योग्य तो वेळ असतो. ज्यावेळी तुम्हाला संकोचलेपणा वाटत नाही. अनेकदा त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो, अनेकदा पाच महिन्यांचा. माझ्या बाबतीत पाच महिन्यांचा कालावधी लागला खरा. पण, आताच्या क्षणाला मी आनंदात असून, मी पुलकीतला डेट करत आहे हे सांगण्यात मला काहीच हरकत वाटत नाही.'



'पागलपंती' या चित्रपटातून हे दोघंही स्क्रीन शेअर करत आहेत. यापूर्वीही त्यांनी एकत्र काम केलं आहे. पुलकित सम्राट बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चर्चेत आला आहे. सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिला हिच्याशी विवाह झाल्यानंतर २०१५ मध्ये पुलकित आणि तिच्या नात्यात दुरावा याला होता. अखेर घटस्फोट घेत ते या नात्यातून वेगळे झाले होते.