मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत kangana ranaut हिनं मुंबईविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर तिच्यावर अनेकांचारोष ओढावला गेला. ज्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्षही विकोपास गेल्याचं चिन्हं आहे. त्यातच ड्रग्ज माफियांबाबत कंगना करत असणारे गौप्यस्फोट, कलाकारांच्या नावांचा खुलासा हे सारं पाहता तिला सुरक्षा पुरवण्यात यावी असा सूरही एका वर्गानं आळवला होता. ज्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कंगनाला 'Y' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाला सुरक्षा देण्यासंबंधीचा हा निर्णय़ होताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं. कलाविश्वातही याचे पडसाद उमटले. ज्यामध्ये कंगनाला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेसाठी आम्ही देत असणाऱ्या कराच्या पैशांचा वापर तर केला जात नाही, अशा आशयाचा प्रश्न एका लोकप्रिय अभिनेत्रीनं विचारला. 


'मी फक्त तपासत होते, की यामध्ये (सुरक्षेसाठी) आम्ही करस्वरुपात भरणाऱ्या पैशांचा वापर तर होत नाही?', असं अभिनेत्री कुब्रा सैत हिनं ट्विट करत लिहिलं. कुब्रानं वृत्तसंस्थेच्या ट्विटची जोड देत तिचा हा बोचरा प्रश्न विचारला. कंगना आणि कुब्राचं समीकरण फार चांगलं नाही. कारण, कंगनानं तिला ट्विटरवर ब्लॉक केलं आहे. 



 


कंगनाविषयी ट्विट करत तिच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या कुब्राला आता नेमकं कोणी उत्तर देणार का, याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. शिवाय कंगनाच्या वक्तव्यावरुन सुरु झालेल्या या वादावर कधी पडदा पडणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल.