सलमान खानला पाठिंंबा दर्शवल्याने `या` अभिनेत्रीला धमकीचे फोन ! पोलिसात FIR दाखल
बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानला जोधपूर सेशन कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवले आहे.
मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानला जोधपूर सेशन कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणामध्ये सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवले असले तरीही त्याचे चाहते आणि बॉलिवूड मात्र सलमान खानच्या पाठिशी उभे राहिले आहे.
कुनिका सदानंदलालला धमकी
अभिनेत्री कुनिका सदानंदलाल ही अभिनेत्री 'हम साथ साथ है' या चित्रपटामध्ये सलमान खानासोबत होती. काळवीट शिकार प्रकरणी त्याला पाठिंबा दिल्यानंतर कुनिका धमकी मिळाली आहे.
कुनिकाला बिष्णोई समाजाकडून धमकी मिळत आहे. जीवेमारणीच्या धमकीप्रमाणेच तिला काही अश्लिल मेसेज येत आहेत. यामुळे ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये कुनिकाने तक्रार केली आहे.
सलमान खानच्या पाठीशी कुनिका
सलमान खानला दोषी ठरवून तुरूंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर कुनिकाने याप्रकरणी काही मतं मांडली आहेत. बिष्णोई समाजदेखील शिकार करते. याकडे एक प्रकरण म्हणून पहावे अशाप्रकारची वक्तव्य कुनिकाने एका टेलिव्हिजन शोमध्ये मांडली होती.
कुनिकाने तिची मतं मांडल्यानंतर या तिला धमकी येण्यास सुरूवात झाली. याप्रकरणी तिने सोशल मीडियावर अनेक ट्विट्स केले आहेत.
कुनिकाच्या माहितीनुसार संतोष बिष्णोईच्या नावाने फोन आला होता. त्यांनी माफी मागायला सांगितली. माफी मागायला नकार दिल्यानंतर तिला धमकी येण्यास सुरूवात झाली. सोशल मीडियामधेयही संबंधित प्रकरणी धमकी आल्यानंतर एफआरआय दाखल केले असल्याचे तिने म्हटले आहे.