अखेरच्या क्षणी अशी दिसत होती श्रीदेवी; पाहा फोटो
मृत्यूसमयी श्रीदेवी त्यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यात रमल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही क्षणापूर्वीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहता त्यांच्या मृत्यूबाबत जराही शंका येत नाही.
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडसह अनेकांना धक्का बसला. त्यांची अभिनय कारकीर्द पाहिली तर, ती सदाबहारच राहिली आहे. त्यांच्या मृत्यूसमयी त्या त्यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यात रमल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही क्षणापूर्वीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहता त्यांच्या मृत्यूबाबत जराही शंका येत नाही.
श्रीदेवीच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांच्या आठणीत चाहते त्यांची गाणी, व्हिडिओ, चित्रपट पहात आहेत. ज्या ज्या मार्गाने श्रीदेवी यांच्याबाबत माहिती मिळेल तसतशी माहिती ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सर्वांना एकच प्रश्न सतावत आहे, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना श्रीदेवीने एक्झिट घेतली. अकाली मृत्यूबद्धल प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
पती बोनी कपूरसोबत श्रीदेवी आपल्या पुतण्याचे लग्न एन्जॉय करत होत्या. मात्र, शनिवारी रात्री अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.
श्रीदेवीच्या निधनानंतर त्यांची पुतण्याच्या विवाहातील छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. यात त्या प्रचंड खूश दिसत आहेत. हे फोटो पाहून त्यांना काही त्रास असेल असे मुळीच वाटत नाही. पण, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यात त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे ५४ होते.