मुंबई : अभिनेत्री माहिका शर्माने गीता कपूर यांना श्रद्धांजली अर्पण करत रागही व्यक्त केला. बॉलीवूडमधील कोणता सेलिब्रेटी गीता कपूर यांना श्रद्धांजली द्यायलाही आला नाही. बॉलीवुडकडे ह्रदय नाही. त्यांना फक्त ट्विट करुन प्रसिद्धी मिळवणं एवढ माहितेय.


माहिकाला झालं दु:ख 


बॉलीवुड अभिनेत्री गीता कपूर यांच दोन दिवसांपुर्वी निधन झालं. पण एकही कलाकार त्यांना श्रद्धांजली द्यायला आला नसल्याचा राग माहिका शर्माने व्यक्त केला.ज्या पद्धतीने गिता कपूर यांना त्यांच्या परिवाराने दूर केलं हे समजल्यावर मी त्यांच्याबद्दल विचार करणंच बंद केलं. मी धावत जाव आणि त्यांची गळाभेट घ्यावी असं मला सारख वाटतं त्यांच्या मुलाने थोडातरी आदर दाखवायला हवा होता. त्याने आईवर अंतिम संस्कार करण्यासाठी तरी यायला हवं होतं. म्हातारपण आल्यावर जर अशी वेळ येत असेल तर मला जास्त वर्ष जगण्याची इच्छा नसल्याचेही तिने सांगितले. आपल्याला मुलगा व्हावा असं अनेकजणांना वाटतं पण मला या तुलनेत मुली जास्त चांगल्या वाटतात. त्यामुळे मुलींना मारण्यापेक्षा प्रत्येकाने मुलींच पालणपोषण करायला हवं.