मुंबई : शाहरुख खानसोबत परदेस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री महिमा चौधरी तुम्हाला माहित तर असेलच. महिमाचा हा पहिला सिनेमा सुररहिट ठरला होता. पण बॉलिवूडमध्ये ती जास्त हिट सिनेमे नाही देऊ शकली. महिमा चौधरीचं खरं नाव रितु चौधरी असं आहे. सुभाष घई यांनी तिला महिमा असं नाव दिलं होतं.


परदेसमधून झाली होती हिट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेस सिनेमातून शाहरुख खानसोबत 'गंगा'ची भूमिका करणारी भूमिका आता कशी दिसते हे पाहून तुम्हाला ही धक्का बसेल. महिमा चौधरी आता 44 वर्षांची आहे. पण आता ती खूप बदलली आहे. महिमाचं वजन खूप वाढलं आहे. महिमा मुंबईच्या रस्त्यांवर दिसली तेव्हा तिला कोणीच ओळखू नाही शकलं.



ओळखणं झालं कठीण


काही दिवसांपूर्वी ती मुंबई एयरपोर्टवर दिसली होती. तेव्हा तिच्यासोबत तिची मुलगी देखील होती. मुंबई एयरपोर्टवर जेव्हा तिला पाहिलं गेलं तेव्हा देखील अनेकांना तिला ओळखता आलं नाही.