मुंबई : प्रेम आणि भक्ती ही एकमेकांची परस्पर पूरक रुपं आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मीरेची भक्ती हे तिचं कृष्णावर असणारं प्रेमच होतं. प्रेमाच्या याच दिवशी एक असंच सुरेख नातं जगासमोर आलं आहे. हे नातं आहे एका अभिनेत्रीचं आणि भोळ्या शंकराचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या पडद्यावर 'देवों के देव महादेव' या मालिकेमध्ये देवी सतीच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री मौनी रॉय हिचं महादेवाशी असणारं हे नातं. 


सध्या मौनी काश्मीरमध्ये तिच्या पतीसोबत काही निवांत क्षणांचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळालं. तिनं सोशल मीडियावर या क्षणांपैकी काही खास दिवसांचे फोटोही शेअर केले. 


मौनीच्या या प्रवासात एक असंही वळण आलं, जिथे तिची गाठ चक्क महादेवाशी पडली. 


देवादी देव महादेव यांच्याशी तिलं कलेच्या निमित्ताने का असेना एक खास नातं जोडलं गेलं. म्हणूनच की काय, तिला काश्मीरमध्येही बर्फानं अच्छादलेल्या एका डोंगरामध्ये शंकराचं मंदिर दिसलं. 


असं म्हणतात तुमच्या मनापासून इच्छा असणाऱ्या गोष्टी या तुम्हाला कशाही भेटतातच. मौनीसोबतही असंच झालं असावं. 



मंदिरात जाऊन तिनं देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिनं हे फोटो चाहत्यांच्याही भेटीला आणले. 



यावेळी देवापुढे नतमस्तक झाल्यानंतर मौनीच्या चेहऱ्यावरच्या भावना आणि त्यानिमित्तानं तिच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू स्पष्टपणे पाहता आले.