मुंबई : काही नेतेमंडळी ही त्यांच्या वादग्रस्त राजकीय कारकिर्दीमुळे चर्चेत येतात. तर काही प्रकाशझोतात येण्यास भलतीच कारणं जबाबदार ठरतात. सध्या अशाच एका व्यक्तीच्या नावानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कला क्षेत्रातील झगमगाटाकडून राजकारणाकडे वळलेलं हे नाव आहे एका अशा अभिनेत्रीचं जिचं खासगी आयुष्य अनेकांच्या भुवया उंचावत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैवाहिक नातं तुटण्यापासून बाळाच्या जन्मामुळं अनेक प्रश्नांच्या वावटळामध्ये अडकलेलं हे नाव म्हणजे खासदार नुसरत जहाँ यांचं. एक काळ असा होता जेव्हा नुसरत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत बोलणं प्रकर्षानं टाळलं होतं. पण, आता मात्र त्या सर्व प्रश्नांची उघडपणे उत्तरं देऊ लागल्या आहेत.


यश दासगुप्ताशी त्यांचं नाव जोडलं गेलं. बाळाच्या जन्माच्या वेळी यशचं क्षणाक्षणाला त्यांच्यासोबत असणं बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेलं. ज्यानंतर आता नुसरत आणि यश या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत बोलण्यास सुरुवात केली आहे. हल्लीच यशचा वाढदिवसही नुसरत यांनी साजरा केला. सोशल मीडियावर त्यांनी या क्षणांचे काही फोटोही शेअर केले. यामध्ये एका फोटोनं सर्वांचंच लक्ष वेधलं.



यशच्या वाढदिवसाच्या केकवर हसबंड (पती) आणि डॅड (वडील) असे शब्द लिहिण्यात आले होते. हा फोटो पाहिल्यानंतर यश आणि नुसरतने लग्न केल्याच्याच चर्चांनी कमालीचा जोर धरला. आता त्यांच्या नात्यात नेमकं कोणतं वळण आलंय याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.



यशच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या जोडीनं कँडललाईट डिनरही केला. या फोटोमध्ये नुसरत यांनी यशसाठी प्रेमाचे शब्दही लिहिले. जाहीरपणे प्रेमाची कबुली देत नात्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या नुसरत जहाँ यांचा हा अंदाज सध्या सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला आहे.