मुंबई : मराठी सिनेमा दिवसेंदिवस नवनवे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच मराठी सिनेमांत कायम वेगवेगळे प्रयोग केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आज मराठी सिनेमांचे रिमेक बॉलिवूड आणि इतर भाषांच्या सिनेमांत होत असताना आपण सैराटच्या निमित्ताने पाहिलं आहे. पण मराठी सिनेमांत आता आणखी एक नवी गोष्ट घडत आहे आणि ती म्हणजे मुलाने लिहिलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन आई करत आहे. 


ही अभिनेत्री मुलाच्या सिनेमाचं करणार दिग्दर्शन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आपल्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून डेब्यू करतात ही गोष्ट आता काही नवीन राहिली नाही. पण मुलाने लिहिलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन आई करणार ही बाब नवी आहे. आणि हा नवा पायंडा रचत आहे अभिनेत्री - दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी. अवंतिका मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या मृणाल कुलकर्णीने सोनपरी या मालिकेतून हिंदी मालिकेत देखील आपलं स्थान बळकट केलं. मृणाल कुलकर्णीने अभिनयासोबतच सिनेमांच लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमाच्या माध्यमातून मृणाल कुलकर्णीने लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर 2014 मध्ये रमा माधव या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. आता मृणाल कुलकर्णी आपल्या तिसऱ्या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा मृणाल कुलकर्णीचा मुलगा विराजस कुलकर्णीने लिहिला आहे. विराज कुलकर्णी 'ती' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 




कोण आहे हा नवा लेखक 


विराजस कुलकर्णी हा मृणाल कुलकर्णी आणि रूचिर कुलकर्णी यांचा मुलगा. विराजसने या अगोदर मृणाल कुलकर्णीच्या रमा माधव या सिनेमांत अभिनय केला आहे. तर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमांत मृणाल कुलकर्णीला असिस्ट केलं आहे. विराजस कुलकर्णीने अनेक नाटकांदेखील काम केलं आहे. 


'ती and ती' सिनेमा 


ती या सिनेमाचं दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी करत असून हा सिनेमा विराजस कुलकर्णीने लिहिला आहे. या सिनेमांत पुष्कर जोग, प्रार्थना बेहेरे आणि सोनाली कुलकर्णी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलिज झालं आहे.