साठी ओलांडलेल्या नीना गुप्तांची सुप्त इच्छा; बोल्ड अंदाजात म्हणाल्या....
तरुण पिढीला लाजवेल असाच हा व्हिडीओ ....
मुंबई : आयुष्य म्हणजे जणू एक मिठाईचं ताट आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या, चवीच्या मिठाई आहेत. प्रत्येक मिठाईची चव जशी वेगळी असते, तसं आयुष्यातील क्षणांचंही असतं. प्रत्येक क्षण एकमेकांहून वेगळाच असतो.
आयुष्याचे हेच क्षण मनमुरादपणे जगण्याला सर्वजण प्राधान्य देतात. अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta) यासुद्धा त्यापैकीच एक. वयाची 60 वर्षे ओलांडली असली तरीही त्यांचा जगण्याचा उत्साह काही केल्या कमी झालेला नाही.
किंबहुना तरुण पिढीला लाजवेल असाच त्यांचा उत्साह असतो. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून वेळोवेळी याचीच प्रचिती येते. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीनं तिच्या मनात दडलेली इच्छा एका व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ नीना गुप्ता यांच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आला आहे. जिथं त्या 'आज फिर जीने की तमन्ना है' या गाण्यावर आपल्या दिलखेचक अदांनी नेटकऱ्यांना घायाळ करत आहेत.
फॅशन म्हणू नका किंवा मग अभिनय, नीना गुप्ता यांनी कायमच काही वेगळ्या आणि तितक्याच लक्षवेधी वाटांची निवड त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत केली आहे. ज्यामूळं चित्रपट जगतात त्यांनी साकारलेल्या कलाकृतींचा अनेकदा गौरवही करण्यात आला आहे. खासगी आयुष्यातही मोठे आणि तितकेच आव्हानात्मक निर्णय घेणाऱ्या या अभिनेत्रीचा हा नवा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ?